Monday, 25 March 2013

"माझा VITA मधील प्रवास"

       "एखादं स्वप्न पाहण, ते फुलवनं, ते सत्यात उतरावं म्हणून धडपडनं आणि त्या धडपडीनंतर मिळालेल्या यशाचा आनंद लुटनं हे स्वाभाविक आहे परंतु हे यश मिळण्यासाठी एका गुरूची गरज असते. असे म्हणतात कि उत्तम यश मिळविण्यासाठी एका उत्तम गुरूची गरज असते आणि  VITA हे माझ्यासाठी एक उत्तम गुरु आहे.
       आज मला मिळालेल्या या यशामागे सगळ्यात मोठा हात हा  "Vidyanidhi Info Tech Academy" चा आहे.  VITA मध्ये असलेले उत्तम व्यवस्थापन यामुळे येथून मिळणाऱ्या ज्ञानामध्ये थोडीही कमतरता नव्हती. पण VITA मध्ये आम्हाला उत्तम ज्ञानाबरोबर चांगल्या संस्काराचीही रुजवण येथे झाली. आयुष्यात माणसाने कसे जगावे हे येथे आम्ही शिकलो कारण येथील शिक्षकांनी ज्ञानाबरोबरच व्यक्तिमत्त्व कसे असावे, सांघिक भावना कशी असावी व नेतृत्वगुण कसे असावे हे शिकविले. त्यामुळेच येथून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञानाबरोबरच सर्वच गोष्टीमध्ये सर्वगुणसंपन्न असतो.
       १२ तास अभ्यास करूनसुद्धा कधी मनाला थकवा जाणवला नाही कारण येथे असलेल्या मैत्रीपूर्ण वातावरणामुळेच. शिक्षकांबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण व्यवहारामुळे अभ्यासाचे दडपण कधीही वाटलेच नाही.
       आदर्श गुरु कसे असावेत हे आम्हाला येथे समजले. सविता madam मुळे उत्तम व्यवस्थापन कसे असावे हे कळले तर केतकी madam , निधी madam, नितीन sir  व पंगम sir यामुळे ज्ञानात भर पडली. पूजा madam  नि आत्मविश्वास वाढविला तर उत्तम व्यक्तिमत्त्व कसे असावे हे विक्रम sir  नि दाखवून दिले.  तर जयंत sir  नि सांघिक कामगिरी कशी असावी हे शिकविले. याचबरोबर येथे खुप चांगले मित्रही मिळाले.
       अशा अनेक गोष्टी VITA मधून मिळाल्या की ज्या कधीही विसरणे अवघड आहे. 

No comments:

Post a Comment